
बीड : विश्व हिंदू परिषदेच्या देवगिरी प्रांत सेवा विभागाच्या वतीने संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यात वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. कोविडचे दोन वर्षे वगळता या उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून वारकऱ्यांच्या सेवेतच पांडुरंग दिसत असल्याची भावना या वैद्यकीय पथकातील कर्मचारी आणि विहिंपचे पदाधिकारी व्यक्त करतात.