दानवेंच्या समर्थनार्थ बैठक, सत्तार, जाधव यांच्यासह 81 सदस्य उपस्थित

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 ऑगस्ट 2019

औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवीने वेग घेतला आहे. अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ अब्दुल सत्तार आणि हर्षवर्धन जाधव यांच्यासह समर्थकांची बैठक शहरात शनिवारी (ता. दहा) रात्री पार पडली. 

औरंगाबाद - औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतांच्या जुळवाजुळवीने वेग घेतला आहे. अंबादास दानवे यांच्या समर्थनार्थ अब्दुल सत्तार आणि हर्षवर्धन जाधव यांच्यासह समर्थकांची बैठक शहरात शनिवारी (ता. दहा) रात्री पार पडली. 

श्री. सत्तार यांच्यासह औरंगाबाद जिल्ह्यातील 81 सदस्य या बैठकीला उपस्थित होते; तर जालना जिल्ह्यातील सदस्यांची संख्या पकडून हा आकडा 125 वर जाईल. ही सर्व ताकद श्री. दानवे यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे सत्तार यांनी म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.

श्री. जाधव यांचेही जिल्ह्यात पाच सदस्य आहेत. एका स्टेजवर सर्व एकत्र आल्याने दानवे यांच्यासाठी पालकमंत्र्यांनी केलेल्या शिष्टाईला यश आल्याची यावेळी चर्चा होती. यावेळी बैठकीत अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर यांची उपस्थिती होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Meeting in support of Ambadas Danve