हिंगोलीत कंत्राटदाराच्या मुद्यावरून बैठक गाजली

zp hingoli
zp hingoli
Updated on

हिंगोली : येथील जिल्‍हा परिषदेच्या स्‍थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (ता. २९) असोलवाडी येथील निविदा प्रक्रियेवरून चांगलेच रणकंदन झाले. तीन वर्षांपासून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकले असताना त्या कंत्राटदाराचे नाव यादीतून का काढले? असा सवाल समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे यांनी उपस्थित केला. या प्रश्नावर अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. उत्तरे देण्यास टाळाटाळ होत असल्याने हा मुद्दा बैठकीत चांगलाच गाजला.

येथील जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात जिल्‍हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली मागील महिन्यात तहकूब झालेली स्थायी समितीची बैठक बुधवारी घेण्यात आली. या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनिष आखरे, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील, कृषी सभापती रत्नमाला चव्हाण, समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे, सीईओ डॉ. एच. पी. तुमोड, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

दीड तास चालली बैठक

मागील महिन्यात स्थायीची बैठक कोरमभावी तहकूब करण्यात आल्याने बुधवारी पहिल्यांदाच नव्या पदाधिकाऱ्यांसमोर घेण्यात आली. कंत्राटदाराच्या मुद्यावरून सभागृहात अधिकारी सहमत होत नसल्याने दीड तास बैठक चालली. तीन वर्षांपासून एकाच मुद्यावर अधिकाऱ्यांना निर्णय घेता आला नसल्यामुळे हा मुद्दा पुन्हा रेटून धरण्यात आला. कंत्राटदाराच्या निविदा प्रक्रिया हा मुद्दा मार्गी लागण्यासाठी समिती नेमली होती. मात्र, समितीनेदेखील निर्णय दिला असताना सीईओ यांनी कारवाई करण्यासाठी टाळाटाळ का केली जाते, यावरून अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

पुन्हा मुद्दा लावून धरणार

यात दोन ग्रामसेवक आणि तीन कंत्राटदार दोषी आढळून आले असतानादेखील अधिकाऱ्यांकडून ठोस निर्णय घेण्यास कोणीही पुढे येत नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा हा मुद्दा लावून धरला जाणार असल्याचे सभापती फकिरा मुंढे यांनी सांगितले. पाणीपुरवठा विभागाला टंचाई निवारण्यासाठी आलेला निधी एका वर्षात खर्च करावयाचा असताना हा निधी धूळखात पडला आहे. त्यामुळे २४ लाखांची कामे रखडली असल्याचे श्री. मुंढे यांनी हा प्रश्न उपस्थित करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या वेळी अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. यावर मात्र सीईओंनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच झापले असून कामे झाली नाही तर तुमच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्‍यांनी सांगितले. 
 

ग्रामसेवकावरील कारवाईस टाळाटा करत
 
कळमनुरी पंचायत समितीमधील ग्रामसेवक दोषी आढळून आल्याने त्याला ६८ लाख ६० हजारांचा दंड लावण्यात मात्र, कारवाई का होत नाही? असा प्रश्न फकिरा मुंढे यांनी उपस्थित केला. यावर गटविकास अधिकारी खिल्लारे यांनी त्यांच्या पगारातून ४.६० टक्के दराने व्याजासह रक्कम कपात करीत असल्याचे उत्तर दिले. परंतु, यावर फकिरा मुंढे याचे समाधान झाले नाही. गटविकास अधिकारी खिल्लारी मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप करून चांगलेच धारेवर धरले. त्यानंतर कृषी सभापती रत्नमाला चव्हाण यांनी जिल्ह्यातील शाळेत शालेय पोषण आहार शिजविला जातो. मात्र, यासाठी गॅस उपलब्ध करून देता येईल का? किंवा यासाठी किती निधी आहे, याची माहिती मागविली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com