
धाराशिव : उत्पादकांना शाश्वत उत्पन्नवाढ मिळावी यासाठी कांद्याची महाबँक, अणुऊर्जेवर आधारित अन्न प्रक्रियेचा मेगा प्रकल्प जिल्ह्यात साकारण्याचे ठरले आहे. या अनुषंगाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाद्वारे २५० एकर जागा उपलब्ध करून देण्याचे ठरल्याची माहिती ‘महाराष्ट्र इन्सिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’चे (मित्रा) उपाध्यक्ष, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.