esakal | 'मुख्यमंत्र्यांनीच भास्कर जाधवांच्या वागण्याचे समर्थन केले'
sakal

बोलून बातमी शोधा

meghna bordikar

'मुख्यमंत्र्यांनीच भास्कर जाधवांच्या वागण्याचे समर्थन केले'

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी: गुहागरचे आमदार भास्कर जाधव (bhaskar jadhav in chiplun) यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये असाच त्यांच्या वागण्याचा इशारा होता. आमदार भास्कर जाधव यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांच्या वागण्याचे समर्थन केले, असा आरोप भाजपच्या जिंतूर येथील आमदार मेघना साकोरे बोर्डीकर (meghna sakore bordikar) यांनी केला आहे. संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याऐवजी महिलेचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील महिलांची बिनशर्त माफी मागावी. त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही आमदार मेघना साकोरे -बोर्डीकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आमदार भास्कर जाधव यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यभरातील महिला तीव्र आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या, गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी चिपळूण येथे मुख्यमंत्र्यांसमक्ष एका संकटग्रस्त महिलेस अपमानास्पद वागणूक दिली. सरकारकडून मदतीची अपेक्षा करू नये असाच त्यांच्या वागण्याचा इशारा होता. आमदार भास्कर जाधव यांना कोणतीच समज न देता उलट त्यांच्याच इशाऱ्यावरून तेथून काढता पाय घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यांच्या वागण्याचे समर्थन केले असून संकटग्रस्तांबाबत सरकार संवेदनशील नसल्याचेच दाखवून दिले आहे, असा आरोप बोर्डीकर यांनी केला आहे.

हेही वाचा: PHOTOS: मुंबई-विजयवाडा महामार्गाच्या दर्जाहीन कामाचा सामान्यांना फटका

संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या संकटग्रस्तांना तातडीची मदत देणे दूरच, मदतीची घोषणादेखील न करता मुख्यमंत्री परत गेले आहेत. भास्कर जाधव यांच्या माध्यमातून बेजबाबदारपणाचे जाहीर दर्शन घडविले आहे, असा टोलाही आमदार बोर्डीकर यांनी लगावला आहे. भास्कर जाधव यांच्या या वागणुकीबद्दल मुख्यमंत्र्यांनीच महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, असे आमदार मेघना बोर्डीकर यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी आमदार भास्कर जाधव यांना पायबंद न घातल्यास राज्यभरातील महिला रस्त्यावर ऊतरतील, असा इशारा आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे.

loading image
go to top