मुरुड - सलूनच्या व्यवसायात स्पर्धा निर्माण करत असल्याच्या संशयावरून मुरुड येथील सलून व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांना मारहाण करत त्यांचे अपहरण केल्याची घटना मुरुड, ता. लातूर येथे मंगळवार ता. 2 सप्टेंबरच्या मध्यरात्री घडली. पोलिसांनी तात्काळ हालचाल करत 24 तासातच धाराशिव येथून तीन अपहरण कर्त्यांना ताब्यात घेतले असून दोघे फरार झाले आहेत.