लॉकडाऊनची काशी करीत ते निघाले झाशीला 

जालना : जिल्ह्यात अडकलेले कामगार सायकलने झाशीकडे सायकलीने प्रवास करताना. 
जालना : जिल्ह्यात अडकलेले कामगार सायकलने झाशीकडे सायकलीने प्रवास करताना. 
Updated on

जालना - मिळेल ते काम करण्यासाठी उत्तर प्रदेशातुन आलेले अनेकजण लॉकडाऊनमुळे विविध ठिकाणी अडकले आहेत. लॉकडाऊन ता.१४ एप्रिलनंतर शिथिल होईल अशी आशा त्यांना होती . मात्र, ता.३ मे पर्यंत पुन्हा लॉकडाऊन वाढल्याने त्यांना इथे राहायचे नाही. लॉकडाऊनच्या काळात खाण्यापिण्याचे हाल होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे संचारबंदी, लॉकडाऊनची काशी करीत या सर्वांनी थेट झाशी गाठायला सुरवात केली आहे. सायकलवर टांग टाकीत हजार किलोमीटर अंतर कापून ते झाशी गाठणार आहेत.  

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्येच परराज्यातील व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक कुटुंब दर मजल दर कोस मुक्काम करत पायी आपल्या गावाकडे परतले आहेत.

उत्तर प्रदेशातून कुल्फी विक्रीचे काम करण्यासाठी आलेले अनेक जण ता.१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन शिथिल होऊन वाहतूक सुरू होईल. या आशेने प्रशासनाने तयार केलेल्या अन्न छत्राखाली राहत होते.

मात्र, आता वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांनी निघायचे ठरवत बुधवारी ( ता.१५)आपला प्रवासाला सुरुवात केली. सोबत काही कपडे आणि फक्त एक वेळच जेवण त्यांच्याकडे आहे. जालना शहरातील आपल्या गाववल्यांना सोबत घेऊन ते पुढे जाणार आहे. 

दहा दिवसांत गाठणार झाशी 

जालना ते झाशीचे जवळपास हजार किलोमीटर अंतर आहे. मुक्काम करत दहा दिवसांत झाशीपर्यंत आम्ही पोहचू असे त्यांना वाटते. गावाकडे लहान मुले, पत्नी आणि आई वाट पाहत असल्याने आम्हाला नाईलाजाने सायकलने जावे लागते असल्याचे त्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The meeting also focused on the Parli bypass, Autism Park proposal, MGNREGA works, while an unexpected power outage and a tree fall marked the event.
Solar Policy
Heavy rainfall disrupted the weekly vegetable market in Ambad, Jalna district, causing large-scale damage to vegetables and a sharp fall in prices.
Insurance Fraud
Marathi News Esakal
www.esakal.com