esakal | जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट 
sakal

बोलून बातमी शोधा

घनसावंगी : जोगलादेवी येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याच्या पुलावरील चेकपोस्टवर तैनात पोलिस.

कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जालना पोलिसांनी जिल्ह्याची सीमा सीलबंद करत ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत. 

जालना जिल्ह्यात ३२ चेकपोस्ट 

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना -  कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदीसह जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जालना पोलिसांनी जिल्ह्याची सीमा सीलबंद करत ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार केले आहेत. 

कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात ही दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढ आहे. परिणामी कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून संचारबंदी लागू करत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात होणारी वाहतूक बंद करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

हेही वाचा : परदेशातून आलेल्या डॉक्टरला नोटीस

जालना जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात होणारी व येणारी वाहतूक मंगळवारी (ता.२४) मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे. यात बुलडाणा, औरंगाबाद, परभरणी आणि बीड जिल्ह्याच्या सीमा पोलिसांनी सीलबंद करण्यासाठी पोलिसांकडून ३२ चेकपेस्ट तयार करण्यात आले आहेत. यात जालना तालुक्यातील सेवली-सिंदखेडराजा मार्गावर सोनदेव, न्हावा-सिंदखेडराजा मार्गावरील कडवंची, वाघ्रुळ-देऊळगावराजा मार्गावरील वाघ्रुळ, बदनापूर तालुक्यातील औरंगाबाद मार्गावरील वरुड, भोकरदन तालुक्यात जयदेववाडी, भोरखेडा, मालखेडा, पारध, हसनाबाद फाटा, अन्वा, जाफराबाद तालुक्यात माहोरा-धाड, वरुड-चिखली, टेंभूर्णी-देऊळगावराजा, शिंदी-चांडोळ, भारज- पिंपळगाव-सराई मार्गावर चेकपोस्ट तयार करण्यात आले आहेत. तर परतूर तालुक्यात लोणीखूर्द-माजलगाव मार्ग, आष्टी-पाथरी मार्ग, सातोना-सेलू मार्ग, मंठा तालुक्यातील पाटोदा खुर्द, मंठा-जिंतूर मार्ग, तळणी-मेहकर मार्ग, उसवद-देवठाणा मार्ग, बेलोरा-राहेरी मार्ग, अंबड तालुक्यातील माहेर भायगाव- औरंगाबाद मार्ग, चिंचखेड-पाचोड मार्ग, किनगांव चौफुली-औरंगाबाद मार्ग, डोणगाव-पाचोड मार्ग, शहागड-पैठण मार्ग, शहागड-गेवराई मार्ग व घनसावंगी तालुक्यातील शिवणगाव बंधारा-बीड जिल्हा हद्द, मंगरूळ बंधारा-बीड जिल्हा हद्द, जोगलादेवी बंधारा हे जिल्हा सीमा सीलबंद चेकपोस्ट तयार करण्यात आले असू वाहतूक बंद करण्यात आली आहे. 

इतर जिल्ह्यालगत असलेल्या इतर जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्याच्या सीमाभागात ३२ ठिकाणी चेकपोस्ट तयार करून पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 
- चैतन्य एस., 
पोलिस अधीक्षक, जालना. 

loading image
go to top