Birds: वातावरण बदलताच लातुरात पक्ष्यांचे आगमन; स्थलांतरित पक्षी वेधताहेत लक्ष, पोषक वातावरण आणि खाद्यामुळे पाणवठ्यांवर रमू लागले पक्षी
Migratory birds arrive in Latur as winter sets in: लातूरमध्ये थंडीची चाहूल लागताच स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. रंगीबेरंगी ‘परदेशी पाहुण्यांनी’ जलाशयांवर आकर्षक दृश्य निर्माण केले आहे.
लातूर: शहरातील आणि जिल्ह्यातील ठिकठिकाणचे पाणवठे भरले आहेत. त्यातच आता थंडीला सुरवात झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणच्या पाणवठ्यांवर नानाविध रंगातील ‘परदेशी पाहुणे’ लातुरकरांचे लक्ष वेधून घेऊ लागले आहेत.