esakal | हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada

हिंगोली जिल्ह्यात भुकंपाचे सौम्य धक्के

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

हिंगोली : जिल्ह्यात, वसमत , औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत शुक्रवारी ता .१० रात्री १०.२२ वाजता जमीन हादरली . वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे (Pangra Shinde) त्याच वेळी एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत . या आवाजाची यवतमाळ (Yavatmal )येथील भूकंपमापक यंत्रावर ३.३ रिश्टर स्केल नोंद झाली आहे. हा भूकंपाचा (earthquakes) सौम्य धक्का असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले.औंढा व कळमनुरी तालुक्यातील अनेक गावांत असे आवाज झाले या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही . मात्र गावकरी भयभीत झाले आहेत जमीन हादरली असल्याचे गावकरी सांगत आहेत.

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत. आतापर्यंत दिडशे वेळेपेक्षा अधिक आवाज आले आहेत. काही ठिकाणी जमीन हादरल्याने ग्रामीण भागातील सर्व गावकरी रस्त्यावर आले होते.जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने हा जिल्ह्यातील भूकंपाचा सौम्य धक्का होता असे सांगितले. त्याची यवतमाळ येथील भूकंपमाक यंत्रावर ३.३ रिश्टर स्केल नोंद झाली आहे . जिल्हाधिकारी जिंतेद्र पापळकर यांनी नागरिकांना घाबरण्याचे काही कारण नाही . स्वतःची काळजी घ्यावी . भूकंपाचा आवाज आल्यास नागरिकांनी घरामध्ये न थांबता बाहेर मोकळ्या जागेत थांबावे असे श्री.पापळकर यांनी आवाहन केले.

हेही वाचा: कौटुंबिक वादातून पत्नीवर विळ्याने वार..उपचारा दरम्यान मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी रात्री १० २२ वाजता व नंतर १०.२८ वाजता दुसरा आवाज झाला. यामुळे वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खांबाळा, सिरळी, आदी गावाचा यात समावेश आहे. कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, असोला, येहळेगाव गवळी, म्हैसगव्हाण, हारवाडी, नांदापुर, पोतरा आदी गावे तर औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी आदी गावाचा यात समावेश आहे.

loading image
go to top