जालना - शिंदीला दुधाची वाहने अडवून दूध सांडले

गजानन सपकाळ
मंगळवार, 17 जुलै 2018

वरुड बुद्रुक (जालना) : जाफराबाद तालुक्यातील शिंदी येथे तालुक्यातील दूध बुलढाणाला घेऊन जाणारी वाहने अडवून दूध सांडून देण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी (ता.17) आंदोलन चालूच असल्याचे दिसत आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने खासदार राजू शेट्टीच्या नेतृत्वाखाली राज्यभर दूध आंदोलन सुरू झाले आहे. 

दूध आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आशा प्रकारच्या घोषणा देत शिंदी येथून बुलडाण्याकडे जाणारी वाहने अडवली, दूधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान देण्याची मागणी पूर्ण न झाल्याने आंदोलन छेडल्याचे प्रेमसिंग धनावत यांनी 'सकाळ'शी  बोलताना सांगितले. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत दररोज गनिमी काव्याने आमचे आंदोलन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: milk agitation at jalna