tanaji borade
sakal
भूम - खर्डा येथील जामखेड (जिल्हा अहिल्यानगर) रोडवरील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. १९ सप्टेंबर) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर ३ ते ४ अनोळखी इसमांनी कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात चालकाचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खर्डा शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे.