इंदुरीकर महाराजांना एमआयएमचा पाठिंबा, तृप्ती देसाईवर गुन्हा नोंदवा... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 फेब्रुवारी 2020

निवृत्ती महाराज इंदुरीकर व तृप्ती देसाई प्रकरणात आता एमआयएमने उडी घेतली असून, इंदुरीकर महाराज यांना पाठिंबा देत प्रसिद्धी मिळविण्यासाठी महाराजांची बदनामी करणाऱ्या तृप्ती देसाईंविरुद्ध गुन्हा नोंदविण्याची मागणी एमआयएमने बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 

बीड - स्वतःला प्रसिद्धी मिळविण्यासाठी तृप्ती देसाई समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराजांची सोशल मीडियावरून बदनामी करत आहे. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी बीडमध्ये एमआयएमचे नगरसेवक अमर शेख यांनी केली आहे. श्री. शेख यांनी मंगळवारी (ता. १८) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. 

महाराष्ट्रात महिलांचे अनेक प्रश्न आहेत. तृप्ती देसाई यांनी त्यांच्या भूमाता ब्रिगेड संघटनेमार्फत महिलांचे प्रश्‍न सोडविण्याची कामे करावीत, त्यांनी यापूर्वी केलेल्या काही कामांचा आदरच आहे; परंतु स्वतःच्या सामाजिक व राजकीय दुकानदारीसाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी चांगल्या माणसाची बदनामी करू नये, आम्ही ही बदनामी खपवून घेणार नाही, असा इशारा अमर शेख यांनी दिला आहे.

हेही वाचा - शेतकरी म्हणतो, साहेब मी जिवंत....अधिकारी म्हणतात मेला

महाराजांची बदनामी करणाऱ्या तृप्ती देसाईवर गुन्हा नोंद करावा, अशा मागणीचे निवेदन अमर शेख यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत गृहमंत्री व पोलिस महासंचालकांना पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM support Indurikar Maharaj