
बीड : दुःखावर मात करत बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्या वैभवी संतोष देशमुख हिच्या शिक्षणात कोणतीही आर्थिक अडचण येऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मस्साजोग (ता. केज) येथे गुरुवारी (ता. १२) भेट देऊन सरनाईक यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.