Beed Crime: नृत्यकलेच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे अपहरण; पोलिसांकडून सुटका, केज येथील कला केंद्र पुन्हा एकदा वादाच्या गर्तेत
Beed News: नृत्य शिकवण्याच्या बहाण्याने बीड जिल्ह्यातील केज येथे १४ वर्षीय मुलीचे अपहरण करण्यात आले. बनावट कागदपत्रांद्वारे तिला बालगृहातून सोडवून परत अडवण्यात आले.
केज (जि. बीड) : नृत्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला केज येथील कला केंद्र चालवणाऱ्या महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे बीडच्या बालगृहातून सोडविले आणि तिला केजमध्ये नेले.