
जालना: अल्पवयीन मुलीची एका खासगी रुग्णालयात प्रसूती झाल्यानंतर घनसावंगीच्या ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना कळवले असता, संबंधित मुलगी आणि तिची आई याबद्दल काहीही बोलायला तयार नाहीत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षकांच्या फिर्यादीनुसार घनसावंगी पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला.