
जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडूनही दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'.
जालना - जन्मदाता पिता अत्याचार करू लागला, सांगूनही आईकडून दुर्लक्ष करण्यात आले, त्यातच पुन्हा एका अनोळखी व्यक्तीकडूनही अत्याचार झाला. अशा स्थितीत कुणाकडूनही मदत मिळेनाशी झाली. त्यातच तिला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले तर न्याय मिळतो, असे कळाले. परतूर येथून तिने कशीबशी मुंबई गाठली. आझाद मैदानावर ती उभी राहिली. तिच्या हातातील काळ्या पाटीवर लिहिलेले होते "न्याय द्या'.
परतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याने अनेक दिवसांपासून अत्याचार सुरू केला. विशेष म्हणजे जन्मदात्या आईनेही तिला न्याय मिळावा यासाठी मदत केली नाही. त्यानंतर अन्य एका व्यक्तीनेही तिच्यावर अत्याचार केला. मात्र तिचे म्हणणे कोणीच ऐकण्यास तयार नव्हते. या सर्व त्रासाला कंटाळून तीन ते चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने कशीबशी मुंबई गाठली.
हेही वाचा : जालना बनलाय गावठी पिस्तुलवाल्यांचा अड्डा
मुंबई येथील आझाद मैदान येथे आंदोलन केल्यावर न्याय मिळतो, हे या पीडित अल्पवयीन मुलीस माहीत असावे. आझाद मैदान गाठत एका काळ्या पाटीवर "मला न्याय द्या' असे लिहून ती उभी राहिली. हा प्रकार एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने पाहिला. त्यानंतर त्या पीडित अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेव्हा जन्मदात्याकडूनच आपल्यावर अत्याचार झाला आहे. तसेच अन्य एका व्यक्तीनेही अत्याचार केल्याची माहिती तिने पोलिस अधिकाऱ्यांना दिली. त्यानुसार मुंबई येथील आझाद मैदान पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तो परतूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.