esakal | अल्पवयीन मुलीवर अत्याचार, १३ जणांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, १३ जणांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
पंजाब नवघरे

वसमत (जि.हिंगोली) : तालुक्यातील (Vasmat) कनेरगाव येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुलीने वसमत ग्रामीण पोलिसांकडे पुरवणी जवाब दिल्यानंतर आणखी १३ जणांवर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. पोलिसांनी तेरा जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. वसमत तालुक्यातील कनेरगाव (Hingoli Crime News) येथील एका मुलीचा एप्रिल २०२१ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच तिच्या पोटात दुखत असल्याने तिच्या सासरच्या मंडळींनी तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले. ती मुलगी पाच महिन्यांची गरोदर असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सासरच्या मंडळींनी घटस्फोट घेतला. या प्रकरणी त्या मुलीने ता. १० जुलै रोजी वसमत ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात मारोती उर्फ पप्पू भालेराव (रा. रूंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.(misbehave with minor girl in vasmat tahsil hingoli crime news glp 88)

हेही वाचा: Corona Updates : नांदेडमध्ये सध्या कोरोनाचे ६४ रुग्ण

सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्या मुलीने सोमवारी (ता.१९) पोलिसांकडे पुरवणी जवाब दिला. त्यामध्ये १२ जणांनी तिच्यावर वेगवेगळ्या वेळी अत्याचार केल्याचे सांगितले. एका महिलेने आरोपींना मदत केल्याचे नमूद केले आहे. त्यावरून मंगळवारी (ता. २०) गुन्हा दाखल करून पोलिसांनी सर्व तेरा जणांना ताब्यात घेतले आहे.

loading image