esakal | Corona Updates : नांदेडमध्ये सध्या कोरोनाचे ६४ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

Corona Updates : नांदेडमध्ये सध्या कोरोनाचे ६४ रुग्ण

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : जिल्ह्यात (Nanded) मंगळवारी (ता.२०) प्राप्त एक हजार ६६६ अहवालांपैकी तीन कोरोनाबाधित (Corona) आले आहेत. सध्या ६४ रुग्ण उपचार घेत असून यात तीन बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. दिवसभरात नऊ जणांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. एकुण बाधितांची संख्या ९० हजार १२७ झाली असून यातील ८७ हजार ४०४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. भावसार चौक नांदेड येथील ४७ वर्षाच्या एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या दोन हजार ६५९ एवढी आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९७ टक्के आहे. मंगळवारी (ता. २०)सायंकाळी पाच वाजेपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १२८, तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे १४० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.(now 64 covid active cases in nanded glp88)

हेही वाचा: लस न घेणाऱ्या लोकांना चीनचा दणका; उपचारापासून राहणार वंचित

नांदेड कोरोना मीटर

एकुण पॉझिटिव्ह - ९० हजार १२७

एकूण बरे - ८७ हजार ४०४

एकुण मृत्यू -२ हजार ६५९

प्रलंबित स्वॅब - ५१

मंगळवारी बाधित - तीन

मंगळवारी बरे - नऊ

मंगळवारी मृत्यू - एक

उपचार सुरू -६४

अतिगंभीर प्रकृती -३

loading image