औसा निवडणूक विभागाचा भोंगळ कारभार

ग्रामिण भागातील मतदारांचा शहर मतदार यादीत समावेश
Election
Electionsakal
Updated on

लातूर : औसा शहराच्या पाच जानेवारी २०२२ रोजी जाहीर झालेल्या अंतिम मतदार यादीतील यादी (Voter list)भाग क्रमांक ४२,४३ व ४४ मध्ये चक्क हासेगाव व अन्य ग्रामिण भागात येणाऱ्या गावातील लोकांचा शहर मतदारयादीत समावेश करुन निवडणूक विभागाने आपल्या अकलेचे तारे तोडल्याचा प्रकार औसा तहसील कार्यालयात उघडकीस आला असुन पालिकेची निवडणूक तोंडावर अली असतांना बोगस मतदार नोंदविण्याची घाई निवडणूक विभागाला कशी (Election Department)झाली असा प्रश्न शहरावासीयांना पडला आहे. या बाबत राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करीत त्वरित बोगस मतदारांच्या नावांचा शोध घेऊन त्यांना वगळण्याची मागणी केली आहे. 

Election
ओमिक्रॉनचा भारतात एक बळी,जगात किती? आरोग्य मंत्रालयानं केलं स्पष्ट

राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, औसा पालिकेची सार्वत्रीक निवडणूक तोंडावर आली आहे. त्यासाठी शहरातील प्रभाग क्रमांक चार मध्ये दोन जणांची नावे बोगस पद्धतीने मतदार यादीत नोंदवीली आहेत. या व्यक्ती औसा शहराच्या रहिवासी नसून या दोघांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करीत येथील निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांशी संगणमत करुन हासेगाव ता. औसा येथील ग्रामपंचायत सदस्या शितल लिंबराज थोरमोटे, व विद्यमान पोलिस पाटील शिवराज शेषेराव कोरे यांनी आपले नाव औसा शहराच्या मतदार यादीत नोंदवीले आहेत. यातील बोगस नावे नोंदविलेल्या व्यक्ती या ग्रामपंचायत सदस्य व पोलिस पाटील आहेत त्यांनी केलेले हे काम त्यांच्या पदाला अशोभणीय असल्याने त्यांना अपात्र घोषीत करावे, शहराच्या मतदारयादी भाग क्रमांक ४२,४३,४४ मध्येही बोगस नावे नोंदविल्याचे दिसुन येत आहे. या प्रकरणी संबंधीत विभागाकडे मतदारयादीची वारंवार मागणी करुनही ती देण्यात आलेली नाही. असा आरोपही त्यांनी या निवेदनात केला आहे. यामुळे येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाचा सावळा गोंधळ उजेडात आला आहे.(Latur news)

Election
कोरोना 20 मिनिटांनंतर होतो 90% ने कमी संसर्गजन्य; संशोधनातून आलं समोर

कागदपत्रे न तपासताच नाव नोंदणी कशी

मतदार यादीत नाव नोंदविण्याची एक प्रक्रिया असते. ज्या शहरात अथवा गावात नाव नोंदवायचे आहे तेथला त्या मतदाराचा रहिवास, घर अथवा तो किती वर्षांपासून शहरात राहत आहे याचा लेखी व पटण्याजोगा पुरावा सादर केल्यावर मूळ ठिकाणच्या मतदारयादीतील त्याचे नाव कमी करून नवीन ठिकाणच्या यादीत त्या मतदाराचे नाव नोंदविले जाते. आता या प्रकरणात निवडणूक विभागाने नेमकी कुठली कागदपत्रे बघून यांना शहराच्या मतदार यादीत स्थान दिले? हे न उलगडणारे कोडे आहे? यात जर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी कांही काळेबेरे केले असेल प्रथम त्यांच्यावर राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांनी कारवाई करावी अशी मागणीही डॉ. अफसर शेख यांनी सकाळ कडे केली आहे.

कांही लोकांनी ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरले आहेत. कागदपत्रे तपासण्यात कुठे आणि कोणी चूक केली हे आम्ही तपासात आहोत. चुकून कोणाची नावे अशा प्रकारे नोंदविली गेली असतील तर त्यांच्या सादर केलेल्या कागदपत्रांची पुनर्तपासणी करून ती कमी करण्याचे काम आम्ही करू."

-प्रवीण आळंदकर नायब तहसीलदार निवडणूक विभाग औसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Political Drama in Kej
Officials from the Food and Drug Administration conducting a raid on Bapu Maharaj's ashram in Mungsapur.
MLA Vilas Bhumare demand financial aid
Deglur Land Controversy: Inquiry Ordered Into Alleged Irregular Plot Distribution
Marathi News Esakal
www.esakal.com