

Karmad MIDC Death Mystery Deepens as Missing Labour Contractor Indrajit Khule Found Dead in Chamber After Ten Days
esakal
करमाड: गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या गोलटगाव येथील ५१ वर्षीय लेबर कंत्राटदाराचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मंगळवारी (ता. ३) दुपारी करमाड एमआयडीसी परिसरातील एका चेंबरमध्ये आढळून आला. इंद्रजीत बाबूराव खुळे (रा. गोलटगाव, ता. छत्रपती संभाजीनगर) असे मृत कंत्राटदाराचे नाव आहे. नवीन कंपनीचे बांधकाम सुरू असलेल्या परिसरातील रस्त्यालगत मृतदेह आढळल्याने एमआयडीसी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.