फुलंब्री - गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ३३ वर्षीय तरुणाचा समृद्धी महामार्गालगत असलेल्या विहिरीत मृतदेह शनिवारी (ता. ३०) आढळून आला. सिद्धार्थ दिलीप पनाड (वय-३३) रा. संजयनगर, मुकुंदवाडी, छ. संभाजीनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.