esakal | हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाज, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
sakal

बोलून बातमी शोधा

भुकंपाचे आवाज

हिंगोली जिल्ह्यात गूढ आवाज, गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात (Hingoli) वसमत, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील अनेक गावांत रविवारी (ता.२५) सकाळी एकापाठोपाठ एक दोन गूढ आवाज भूगर्भातुन (Mistrious Sound From Ground) आले आहेत. यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तालुक्यातील पांगरा शिंदे हे जमिनीतील गुढ आवाजाचे केंद्र मानले जाते. या गावासह औंढा (Aundha Nagnath) व कळमनुरी (Kalamnuri) तालुक्यातील अनेक गावांत रविवारी सकाळी ७.१५ व त्यानंतर ८.१९ एकापाठोपाठ एक असे दोन आवाज झाले. या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. जमीन हादरली असल्याचे गावकरी सांगत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे (Pangara Shinde) गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतून गुढ आवाज येत आहेत. आतापर्यंत शंभर वेळेपेक्षा अधिक हे आवाज आले आहेत. काही वर्षांपूर्वी हे आवाज वर्षे, दोन वर्षाला येत असत त्यानंतर हे आवाज सहा महिन्यांवर आले मागच्या दोन वर्षांत आठ पंधरा दिवसाला असे आवाज येत होते.(mistrious sound from ground in hingoli district glp88)

हेही वाचा: चिरमुड्या भाऊ-बहिणीचा गुदमरुन मृत्यू, आईवडीलांवर उपचार सुरु

दरम्यान हे आवाज पांगरा शिंदे गावात आल्यावर या गावालगत असलेल्या औंढा नागनाथ व कळमनुरी तालुक्यातील काही गावांत येत आहेत. रविवारी सकाळी ७.१५ वाजता जमिनीतून पहिला आवाज आला. त्यानंतर ८.१९ वाजता दुसरा आवाज आला. या आवाजाची तीव्रता अधिक असल्याचे गावकरी सांगत आहेत. हे आवाज पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खापरखेडा, खांबाळा तर औंढा तालुक्यातील पिंपळदरी परिसर, तर कळमनुरी तालुक्यातील असोला, पोतरा, बोल्डा, सोडेगाव, म्हैसगव्हाण, हारवाडी आदी गावात आले आहेत. या आवाजाने कोणतीही हानी झाली नाही. मात्र गावकरी भयभीत झाले आहेत. या आवाजाचे गुढ मात्र अद्याप उकलले नाही. येथे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील तज्ज्ञांनी भेटी दिल्या आहेत. आवाज आल्यावर गावकरी जिल्हा प्रशासनाकडे ही माहिती दिली जाते. दरम्यान आज सकाळी एकापाठोपाठ एक झालेल्या आवाजाने या सर्वच गावातील गावकरी रस्त्यावर आले होते. गावात कोठे काही झाले का याची माहिती घेत होते. जिल्हा प्रशासनाने या आवाजाचे गूढ उकलावे अशी मागणी केली जात आहे.जिल्ह्यात वारंवार भूगर्भातून गूढ आवाज येण्याच सत्र सुरूच आहे.

loading image
go to top