esakal | जिल्हा परिषद अध्यक्षांना रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने आमदार बांगर भडकले

बोलून बातमी शोधा

संतोष बांगर
जिल्हा परिषद अध्यक्षांना रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने आमदार बांगर भडकले
sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांची तब्येत बरी नसल्याने त्यांना औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यासाठी १०८ रुग्ण वाहिका वेळेवर मिळत नसल्याने आमदार संतोष बांगर भडकले वीस मिनिटात रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यास रस्त्यावर गाड्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा इशारा देताच रुग्णवाहिका मिळाली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांची तब्येत बरी नसल्याने बुधवारी त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. सीटीस्कँन केल्यावर त्यांचा स्कोर १५ तर शुगर देखील वाढली असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

हेही वाचा - नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

मात्र पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद येथे नेण्यासाठी १०८ रुग्ण वाहिकेला संपर्क केला असता दोन तास रुग्ण वाहिका मिळाली नाही. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांना ही माहिती कळताच ते भडकले रुग्ण वाहिका वीस मिनिटात पाठवा नाहीतर पेट्रोल टाकून गाड्या जाळून टाकीन असा इशारा देताच रुग्ण वाहिका रात्री अकरा वाजता मिळाली. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील मेडीकोअर हाँस्पीटल येथे उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चांगली असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाना रुग्णवाहिका वेळेवर मिळत नसल्याने सर्व सामान्याचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच १०८ या गाडीला जिल्हाच्या सीमा देखील असल्याने इतर जिल्ह्यातील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यासाठी अडचणी येतात. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष श्री. बेले यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय देखील इतर खाजगी वाहनाने गेले होते. त्यामुळे रात्री अडीच वाजता औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे