MLA Dhananjay Munde Prepares and Distributes Khichdi Prasad
sakal
परळी वैजनाथ - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी आपल्या कर्मभूमीत म्हणजे परळी परिसरातील चांदापूर मार्गावरील ग्रामदैवत श्री डोंगरतुकाई देवीच्या मंदिर डोंगरावर जाऊन नवरात्रीनिमित्त श्री डोंगरतुकाई देवीचे दर्शन घेतले. या ठिकाणी ते अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने भाविकांना वितरित करण्यात येणाऱ्या खिचडी प्रसादाच्या ठिकाणी भेट देऊन स्वतःच्या हाताने प्रसाद खिचडी तर बनवलीच. शिवाय बनवलेली ती खिचडी स्वतःच्या हाताने भाविकांना वितरित केली.
आमदार श्री मुंडे यांच्या या सेवाभक्तीची व भक्तीभावाची आणि केलेल्या सेवेची चर्चा येथे होत आहे.