MLA Dhananjay Munde
sakal
परळी वैजनाथ - पाचवे ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या विकासकामांमुळे सध्या परळीचे धार्मिक वैभव नव्या रूपात खुलत असतानाच, मंदिर परिसरातील एका सेल्फी पॉईंटची चांगलीच चर्चा रंगली आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांनी मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या भव्य त्रिशूळाजवळ सेल्फी काढला आणि काही क्षणांतच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.