mla narayan kuche and cm devendra fadnavis
sakal
बदनापूर - जालना जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून अतिवृष्टीने थैमान माजवले आहे. त्यात खरीप पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान झाले. शासनाने तातडीने सर्व बाधित क्षेत्राचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी बदनापूर मतदार संघाचे आमदार तथा भाजपचे जालना जिल्हाध्यक्ष नारायण कुचे यांनी मंगळवारी (ता. २३) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना मुंबई येथे प्रत्यक्ष भेटून आणि निवेदन सादर करून केली आहे.