esakal | आमदार नवघरे यांनी ट्रँक्टरव्दारे केली नदीकाठच्या नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी । MLA Navghare
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार नवघरे यांनी ट्रँक्टरव्दारे केली नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी

आमदार नवघरे यांनी ट्रँक्टरव्दारे केली नुकसानग्रस्त शिवाराची पाहणी

sakal_logo
By
संजय बर्दापूरे

वसमत : वसमत तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले. यात सर्वात मोठा फटका नदीकाठच्या शेती पिकास बसला. संपुर्ण शेतात पिके पाण्याखाली झाकल्या गेल्याने हाती आलेले सोयाबीन, कापूस, तुर पिकाला जागेवरच मोड येऊन प्रचंड नुकसान झाले. आमदार राजू नवघरे यांनी गुरुवार ता.३० व शुक्रवार ता.१ नदीकाठच्या गावाच्या शिवारात नुकसानीची पाहणी केली. चिखल व पाण्यामुळे कार व दुचाकीस अडथळा येत असल्याने त्यांनी चक्क ट्रँक्टरचे स्टेअरींग हातात घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. तसेच पिक विम्यासह आर्थिक मदत मिळवून देण्याची हमी शेतकऱ्यांना दिली.

हेही वाचा: मांजराचे दरवाजे बंद तर निम्न दुधनातुन विसर्ग सुरू

राज्यभरात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला. यामध्ये सर्वात मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. वसमत तालुक्यात नदीकाठच्या शेतकर्यांची पिके पाण्याखाली गेली. यामुळे सोयाबिन, कापूस, तुर , ऊस आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पिकांना जाग्यावरच मोड फुटल्याचे सर्वदूर चित्र आहे. तालुक्यात अतिवृष्टीमुळे तब्बल ५९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

आमदार राजू नवघरे यांनी तात्काळ मुंबई येथे मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्यासह आर्थिक मदत देण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार नवघरे यांनी गुरुवारी व शुक्रवारी तालुक्यातील पुर्णा नदीकाठावर असलेल्या सोन्ना शिवारात भेट दिली. शिवारात पाणी व चिखल असल्याने कार व दुचाकी जात नसल्याने त्यांनी चक्क ट्रँक्टरचे स्टेअरींग हातात घेऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. याबरोबरच सावंगी, ब्राम्हणगाव येथील पुर परीस्थिती व पिक नुकसानीची पाहणी केली. यावेळी आमदार नवघरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ पिक विम्यासह आर्थिक मदत मिळवून देण्याची हमी दिली.

loading image
go to top