आधीचेच खड्डे बुजविण्यासाठी शासनाचे दोन कोटी खड्ड्यांत : आमदार प्रशांत बंब यांनी ठोठावले खंडपीठाचे दरवाजे.

high Court Aurabgabad News
high Court Aurabgabad News
Updated on: 

औरंगाबाद : शासनाने 32 कोटींच्या रस्ते दुरुस्तीच्या कामाच्या निविदेला मंजूरी दिली नसताना, त्याच कामाची 35 कोटींची फेर निविदा मंजूर केल्याबाबत आमदार प्रशांत बंब यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील पेनूर - शेवडी- सोनखेड ते वारुळ या राज्य रस्ता क्रमांक 255 च्या 30 किलोमीटर रस्त्याच्या दुरुस्ती कामाचे 32 कोटी 30 लाख 64 हजार 137 रुपयांची पहिली निविदा काढण्यात आली होती. 12 एप्रिल 2016 च्या शासन निर्णयानुसार 30 कोटींपेक्षा जास्तीच्या कामाच्या निविदांना शासनाकडून मंजूरी घेणे बंनकारक आहे. 

परंतू निविदा मंजूर केलेल्या जी.जी. कन्सट्रक्‍शन्स विरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाल्यामुळे पहिली निविदा शासनाने नामंजूर केली होती. त्याच कामाची 35 कोटी 25 लाख 79 हजार 154 रुपयांची फेर निविदा मंजूर करण्यात आली. इतकेच नव्हे तर त्या कामाचा कार्यादेश आणि 5 कोटी रुपये संबंधित कन्सट्रक्‍शन्स या कंत्राटदाराला दिल्याचे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. त्यांनी राज्य शासन, सामान्य बांधकाम विभाग आणि नांदेड येथील गार्गी कन्सट्रक्‍शन्स यांना प्रतिवादी केले आहे. आमदार बंब यांच्यावतीने ऍड. सचिन देशमुख काम पाहत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com