MLA Sambhaji Patil Nilangekar
sakal
निलंगा - महाराष्ट्र राज्यावर दुष्काळाचे भयाण संकट घोंगावत असताना, दुष्काळग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आपले संपूर्ण एक वर्षाचे लोकप्रतिनिधी म्हणून मिळणारे मानधन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय माजी मंत्री व निलंग्याचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी घेतला आहे. तसेच चारा उत्पादन व चारा छावणी उभारणीसाठी आपली २५ एकर जमीन देत असल्याचेही त्यांनी जाहीर करत हा निर्णय आपल्या आईच्या प्रेरणेनेच हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.