आमदार संतोष बांगरच्या संवादामुळे अनर्थ टळला; औंढा तालुक्यातील घटना

औंढा तालुक्यातील तुर्क पिंपरी येथील अनंतसागर शिरसाठ याने घरकुलाच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती.
शोले स्टाईल आंदोलन
शोले स्टाईल आंदोलन

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील तुर्कपिंपरी (Andha nagnath ) गावात सोमवारी ता. दहा सायंकाळी एका युवकाने घरकुलासाठी (house) मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येची धमकी दिली गावकऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांना हा प्रकार कळविला आमदार बांगर (mla santosh bangar) यांनी व्हिडीओ कॉलींगद्वारे त्याच्याशी संवाद साधून त्याचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तो युवक खाली उतरला. एक तासानंतर तो खाली उतरल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. MLA Santosh Bangar's dialogue averted disaster; Incidents in Aundha taluka

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार औंढा तालुक्यातील तुर्क पिंपरी येथील अनंतसागर शिरसाठ याने घरकुलाच्या मागणीसाठी वेळोवेळी पंचायत समिती व ग्रामपंचायतीकडे मागणी केली होती. मात्र त्याला घरकुल मिळाले नाही. प्रशासनाकडून घरकुल देण्याचे आश्वासनच दिले जात असल्याने तो युवक परेशान झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात तो युवक सोमवारी (ता. १०) सायंकाळी मोबाईल टॉवरवर चढला. हा प्रकार गावकऱ्यांना कळाल्यानंतर गावकऱ्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तो ऐकण्याच्या मनः स्थितीत नव्हता. मला घरकुल मिळाल्या शिवाय खाली उतरणार नाही बळजबरी केली तर आत्महत्या करेल अशी धमकी देखील दिली.

हेही वाचा - कामे वेळेत व दर्जेदारपणे पूर्ण करा; अन्यथा काळ्या यादीत टाकू- अशोक चव्हाण

या प्रकारामुळे गावकरी चांगलेच अडचणीत सापडले. त्यानंतर गावकऱ्यांनी शिवसेनेचे औंढा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, लल्ला देव यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर त्यांनी तातडीने तुर्कपिंपरी गाव गाठले. त्यांनी अनंतसागर यास खाली उतरण्याची विनंती केली. मात्र आमदार संतोष बांगर यांनी आश्वसन दिले तर उतरणार असे त्याने सांगितले. त्यानंतर लल्ला देव यांनी आमदार बांगर यांनी व्हिडीओ काॅलकरुन संपर्क साधला. त्याचे सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले त्यानंतर अंनतसागर खाली उतरला. एक तास हा प्रकार सुरु होता. यावेळी गावकरी जमा झाले होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com