गेवराई - विधानसभा मतदार संघात अतिवृष्टीने झालेल्या खरिप पिकाचे नुकसान पहाता गुरूवारी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित यांनी थेट कृषी मंत्री यांना फोन करून सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली. एवढेच नाहीतर ई-पीक पाहणी अॅप्सचे सर्व्हर डाऊन असल्याने पिक पेरा नोंद होत नसल्याची कैफियत मांडली.