मतदारसंघातील नागरिकांसाठी आमदार बोर्डीकर सरसावल्या

गणेश पांडे
Saturday, 28 March 2020

महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या-त्या जिल्ह्यात राहत असलेल्या जिंतूरच्या नागरिकांच्या समस्या आमदार बोर्डीकर यांनी सोडविल्या

परभणी : राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात राहत असलेल्या जिंतूर मतदार संघातील नागरिकांच्या नागरिकांच्या संघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी जिंतूरच्या भाजपच्या आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांनी शनिवारी (ता.२८) महाराष्ट्रातील निरनिराळ्या जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्या-त्या जिल्ह्यात राहत असलेल्या जिंतूरच्या नागरिकांच्या समस्या सोडवल्या.
‘कोरोना’ महामारीच्या पार्शभूमीवर जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी त्यांच्या मतदारसंघातील मतदारांच्या  विविध समस्या व सुरक्षिततेसाठी  महाराष्ट्रातील बहुतांष जिल्हाधिकाऱ्यांसह वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे.  आपल्या मतदारांना मदतीचा हात देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच आहे.  महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचा संसंर्ग पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर सबंध देशभरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. सोशल डिस्टंस साधत स्टे ॲट होम अशा सुचना करण्यात आलेल्या आहेत. या अंतर्गत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  

हेही वाचा - ‘सकाळ’मुळे आई-मुलाची झाली भेट

नागरिकांशी साधला संर्पक
जिंतूर-सेलूच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी  जिंतूर आणि सेलूतील वैद्यकीय सुविधांचा आढावा घेतल्या नंतर प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या. सेलू - जिंतूर मधील बरेच लोक  कामानिमित्त  महाराष्ट्रच्या काना कोपऱ्यात पसरले आहेत. अचानक झालेल्या कर्फ्यु मुळे बाहेरील लोकांची तारांबळ उडत होती. या मतदार संघातील नागरिकांनी संपर्क साधल्यानंतर तात्काळ आमदार बोर्डीकर यांनी सांगली मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, नाशिक, रत्नगिरी , सोलपुर, कोल्हापुर आदिंसह विविध जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून  मतदार संघातील नागरिकांच्या अडचणी मार्गी लावल्या.
 
बेघरांसाठी अन्नछत्र
या अंतर्गत मतदार संघातील स्थलांतरीत नागरिकांना स्वस्त धान्य ऊपलब्ध करून देणे, त्यांच्या निवास आणि स्थानिक वाहतूकी संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यात आले आहेत. संपुर्ण लॉकडाऊन होण्या पूर्वीच आमदार बोर्डीकर यांनी सेलू आणि जिंतूर येथील आरोग्य केंद्रांना भेटी देवून तेथील सुविधांचा आढावा घेतलेला आहे. त्यांच्या सेलु कार्यालयातून बेघरांसाठी मागील ३ दिवसांपासून अन्नछत्र चालु केले आहे . सेलू, जिंतूर व परभणी येथील त्यांची संपर्क कार्यालये सध्या सुरूच असून लोकाना मदत करने चालू आहे.  या अति महत्वाच्या वेळी आपण सर्वांनी एकजुटीने प्रशासनास सहकार्य करत या रोगावर मात करणारच असा  विश्वास आमदार मेघना बोर्डीकर यांच्या व्यक्त करत मतदारांना दिलासा दिला.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLAs Borderers moved for the citizens of the constituency