गेवराई - बीडच्या गेवराईतील गढीच्या उड्डाण पुलावर झालेल्या अपघात प्रकरणी आमदार विजयसिंह पंडित यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केल्यानंतर आज त्यांनी बीड कलेक्टरच्या दालनात आढावा बैठक घेऊन महामार्गाच्या दुरावस्थेचा पाढा गिरवला. कलेक्टर विवेक जॉन्सन यांनी गांभीर्याने संबंधित विभागाला सुचना दिल्या आहेत.