esakal | धारूरच्या नगराध्यक्षकाडून गर्भवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

beed

गुन्ह्याचा तपास केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे करत आहेत

धारूरच्या नगराध्यक्षकाडून गर्भवतीचा विनयभंग; गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड: जिल्ह्यातील किल्लेधारूर शहराचे प्रथम नागरिक व भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. स्वरूपसिंह हजारी यांनी सोनोग्राफी करण्याच्या बहाण्याने गर्भवती महिलेचा विनयभंग केल्याच्या फिर्यादीवरून धारूरमध्ये मंगळवारी (ता. ३१) गुन्हा नोंद झाला. डॉ. स्वरूपसिंह हजारी धारूरचे नगराध्यक्ष आणि भाजप राज्य कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांचा वैद्यकीय व्यवसाय देखील आहे. मंगळवारी धारूर येथील रहिवाशी महिला उपचारासाठी दवाखान्यात गेली असता विनयभंग केल्याचे पीडितेने धारूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. येथील नगराध्यक्ष यांच्यावर ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी विनयभंगासह अनुसूचित जाती जमाती कायद्यानुसार गुन्हा नोंद झाला आहे. गुन्ह्याचा तपास केजचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय लगारे करत आहेत.

डॉक्टरांचा बंद; पोलिस बंदोबस्त-

गुन्ह्याच्या निषेधार्थ येथील डॉक्टर असोसिएशनने बंद पुकारला आहे. गुन्हा नोंद झाल्यानंतर डॉक्टर हजारी यांच्या दवाखाना परिसरात मोठी गर्दी झाली. इतर विविध संघटनांनी ही बंद पुकारला आहे. हा गुन्हा मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली आहे. यामुळे शहरात मंगळवार सायंकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस प्राशसनाचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे.

loading image
go to top