
लातूर : येथील बार्शी रस्त्यावर असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर सोमवारी (ता. १९) ट्रॅक्टर-ऑटोरिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात तिघे ठार झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व ऑटोरिक्षातील प्रवासी आहेत. त्यांच्यावर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.