esakal | उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

corona

चिंताजनक! उमरग्यात महिनाभरात दीड हजारांहून अधिक कोरोना रुग्ण

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद): तालुक्यात एप्रिल महिन्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले. महिनाभरात तालुक्यात एक हजार ५७३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, या महिन्यात सर्वाधिक १०१ रुग्ण दगावले आहेत. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व सुविधांमुळे ९५३ व्यक्ती रिकव्हर झाले आहेत.

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा फैलाव एप्रिल महिन्यात चौपटीने वाढला. शहरातील सरकारी व खासगी रुग्णालयात तालुक्यासह शेजारील कर्नाटक राज्य, निलंगा व तुळजापूर तालुक्यातील व्यक्ती कोरोना चाचणी व उपचारासाठी येत आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून आणि काही खासगी कोविड रुग्णालयातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महिनाभरात एक हजार ५७३ व्यक्ती बाधित आढळून आल्या. त्यातील ९५३ व्यक्ती बरे होऊन घराकडे परतल्या आहेत तर १०१ जणांचा मृत्यू झाला आहे. यातील सर्वच मृत्यू उमरगा तालुक्यातील नाहीत. त्यात कर्नाटकातील आळंद, बस्वकल्याण तालुक्यासह निलंगा तालुक्यातील काही व्यक्तींचा समावेश आहे.

हेही वाचा: लसीचा तुटवडा, ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी लसीकरण तूर्तास बंद

आता मे महिन्याची चिंता

एप्रिलच्या ३० दिवसांतील ही आकडेवारी आहे. त्यात मुरूम सरकारी रुग्णालय व शहरातील काही खासगी कोविड सेंटरमधील आकडेवारीचा समावेश नाही. त्यामुळे एप्रिल महिन्यातील बाधित व्यक्तींची संख्या नक्कीच चिंता वाढणारी आहे. आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात संसर्ग कमी होण्यासाठी नागरिकांचे पाऊल उंबरठ्याबाहेर पडायला नको.

loading image