
जालना : उत्कृष्ट दर्जा, उत्कृष्ट चव, रंग व टिकाऊपणामुळे केंद्र सरकारने जालना हा मोसंबी उत्पादक जिल्हा म्हणून घोषित केले. कृषी विभाग, कृषी संशोधन केंद्र आणि फळे व मोसंबी उत्पादक बागायतदार संघाच्या प्रयत्नातून या भागातील मोसंबीला २०१४ मध्ये ‘जीआय’ (भौगोलिक चिन्हांकन) मानांकन मिळाले.