
लोहारा (जि. धाराशिव): कौटुंबिक वादाच्या कारणावरून मुलाने व सुनेने आईचा खून केल्याची धक्कादायक घटना लोहारा शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुलगा व सुनेविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. २६) रात्री उशिरा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीने संशय येऊ नये म्हणन केलेला बनाव उघड झाला.