मुलगा गतिमंद..आईचं सर्व काळजी घ्यायची, पण तिने स्वतःला कायमचं संपवलं | Parbhani Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suicide case

मुलगा गतिमंद..आईचं सर्व काळजी घ्यायची, पण तिने स्वतःला कायमचं संपवलं

जिंतूर (जि.परभणी) : शहरातील संभाजीनगर परिसरात एका बत्तीस वर्षीय विवाहितेने घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जया बाबासाहेब गायकवाड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत आत्महत्याग्रस्त महिलेच्या नातेवाईकांकडून समजलेली माहिती अशी की, जया गायकवाड यांचे सतरा वर्षांपूर्वी बाबासाहेब गायकवाड यांच्यासोबत विवाह झाला होता. त्यांना १४ व १२ वर्षांची दोन मुले असून चौदा वर्षांचा मोठा मुलगा गतिमंद असल्याने त्याची सर्व काळजी आई जया याच घेत असत. (Mother Left Son And Committed Suicide In Jintur Of Parbhani)

हेही वाचा: Nana Patole | परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ? : नाना पटोले

मात्र गुरुवारी (ता.३१) सकाळी अकराच्या सुमारास जया गायकवाड यांनी घरातील छताच्या पंख्याला साडी बांधून आत्महत्या केली. नातेवाईकांनी मृतदेह जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता डाॅ.शिवाजी हरकळ यांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. रूग्णालयात पोलीस दाखल झाले. परंतु मृत महिलेचे आईवडिल मुंबई येथून शनिवारी (०१ एप्रिल) सकाळी येथे आल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद झाल्याचे समजले असून नेमके मृत्यूची कारण समजू शकले नाही.

Web Title: Mother Left Son And Committed Suicide In Jintur Of Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :ParbhaniJinturCrime News
go to top