Nana Patole | परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ? : नाना पटोले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole and Narendra Modi

Nana Patole | परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ? : नाना पटोले

मुंबई : पेट्रोल व डिझेलची भाववाढ सुरुच आहे. गुरुवारी (ता.३१) या दोन्ही इंधनांच्या दरात प्रत्येकी ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये पेट्रोल व डिझेल दरात ६ रुपये, ४० पैशांनी वाढ झाली आहे. यामुळे महागाईत (Inflation) आणखीन भर पडली आहे. काँग्रेस (Congress Party), राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) या पक्षांनी राज्यात महागाईविरोधात आंदोलने केली आहेत. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र नरेंद्र मोदी सरकार त्यांना दिलासा द्यायला तयार नसल्याचे दिसत आहे. (Nana Patole Attack On PM Narendra Modi Over Inflation)

महागाईवरुन काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर आज शुक्रवारी (ता.एक) ट्विट करत टीका केली आहे. पटोले म्हणतात, चाय पे चर्चा, परीक्षा पे चर्चा, पण महागाईवर चर्चा कधी मोदीजी ?

आज मोदींनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा' या संवाद कार्यक्रमाअंतर्गत बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होते ही समस्या नाही, तर आपल्या मनाची एकाग्रता न होणे ही समस्या आहे. अभ्यासात मन न लागल्यास कोणतीही परीक्षा असो त्यात गोंधळ होणार, असे मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

या संवाद कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, शिक्षक आदींनी ऑनलाईन सहभाग नोंदवला. याप्रसंगी पंतप्रधानांनी निवडक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.