लसीकरणात उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल | Parbhani | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लसीकरण

परभणी : लसीकरणात उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

परभणी : कोरोना विषाणु संसर्गावर संजिवनी ठरलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या उद्दिष्टपूर्तीकडे जिल्ह्याने वाटचाल सुरू केली आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) तब्बल १३ लाख ९८ हजार ६४३ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यातील ९ लाख ८१ हजार ८३० नागरिकांनी पहिला तर ४ लाख १६ हजार ८१३ लोकांनी दुसरा डोस घेतलेला आहे.

परभणी जिल्ह्यात लसीकरणाचे काम आता वेगाने होत आहे. लोकांमध्ये झालेली जागृती व प्रशासनाच्या कडक धोरणामुळे हे काम सहज शक्य झाले आहे. मध्यंतरीच्या काळात लसीकरणात जिल्हा प्रचंड पिछाडीवर पडला होता. त्यामुळे ज्या जिल्ह्यात लसीकरण वेग घेत नाही अश्या जिल्हांचा आढावा स्वता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला होता. त्यात परभणीचाही समावेश होता.

हेही वाचा: बीड : जिल्हा रुग्णालयाकडे थकले ७२ कोटी

या बाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कडक भुमिका घेत जनजागृतीवर भर दिला होता. त्यामुळे लसीकरणाच्या कामाने वेग घेतला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी देखील ग्रामीण भागात स्वता फिरून लोकांमध्ये जागृती करण्याचे काम केले. त्यांच्या अधिनिस्त काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके देखील ग्रामीण भागात फिरून लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करताना दिसत होती. यामुळे १४ लाख नागरीकांच्या लसीकरणाचा मोठा टप्पा पार पडला आहे.

मंगळवारी (ता.१६) हाती आलेल्या आकडेवारी नुसार जिल्ह्यात ९ लाख ८१ हजार ८३० लोकांनी पहिला डोस घेतला आहे. तर ४ लाख १६ हजार ८१३ लोकांनी दुसरा डोस पूर्ण केला आहे. जिल्ह्यात सध्या २०४ शासकीय केंद्राद्वारे लसीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे.

वयोमनाचा विचार केल्यास १८ ते ४४ वयोगटातील ७ लाख ५० हजार २४० लोकांनी लसीकरण करून घेतले आहे. तर ४५ ते ६० वयोगटातील ३ लाख २६ हजार ८८३ लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. ६० वर्षाच्या पुढील ३ लाख २१ हजार ५२० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. जिल्ह्यात एकूण झालेल्या १३ लाख ९८ हजार ६४३ नागरिकांपैकी ७ लाख २३ हजार ८४ पुरुष नागरीक आहेत. तर ६ लाख ७५ हजार ४१५ महिलांचा समावेश आहे. जिल्ह्याला सर्वाधिक साठा कोविशिल्डचा होत असल्याने १० लाख ४६ हजार ६२६ नागरिकांना कोविशिल्ड लसीचे डोस देण्यात आले आहेत. तर कोव्हॅक्सीन लस ३ लाख ५२ हजार १७ लोकांनी घेतली आहे.

सध्या कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढतोय

जिल्ह्यात कोरोना विषाणुचा संसर्ग पुन्हा एकदा डोक वर काढत असल्याचे दिसून येत आहे. सध्या सर्व व्यवहार सुरुळती सुरु झालेले आहेत. त्यामुळे लोकांचा संपर्क वाढला आहे. रेल्वे, खासगी वाहतुक, सिनेमागृह, सुपर शॉपी तसेच लग्न कार्यास परवानगी मिळालेली असल्याने लोक एकमेकांच्या सर्वाधिक संपर्कात येत आहेत. त्यामुळे परत एकदा जिल्हात कोरोनाचे सक्रीय रुग्णसंख्या २७ वर गेली आहे.

loading image
go to top