
बीड : मागील काही वर्षात जिल्ह्यात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून याला राजकीय नेत्यांचा वरदहस्त आहे. यामुळे जिल्ह्यात अनेक अवैध धंदे चालत असून याच अवैध धंद्यातून आलेल्या पैशातून गुंडाराज फोफावत आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्ह्यातील गुंडाराजचा खात्मा करावा, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय सक्सेना यांच्याकडे केली आहे.