
खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी मागणी केली होती त्यांच्या मागणीला यश आले आहे .
हिंगोली : हिंगोली येथे केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या मागणीला केंद्रीय माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी मान्यता देऊन याबाबतचा रितसर अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात यावा असे पत्राद्वारे कळविलें आहे . खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी मागणी केली होती त्यांच्या मागणीला यश आले आहे .
नांदेड, मुदखेड नंतर हिंगोली येथे सुद्धा केंद्रीय विद्यालयाची स्थापना करण्यात यावी याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि सूचना प्रसारण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे मागणी केली होती. या मागणीला यश आले असून केंद्राकडून स्थापनेचा मार्ग मोकळा झाला असून केंद्रीय विद्यालयाचा प्रस्ताव राज्यशासनाकडे तात्काळ सादर करावा अश्या सूचना देण्यात आल्या आहेत . हिंगोली मतदार संघात एकूण ११ तालुक्यांचा समावेश होतो. जिल्ह्यात रेल्वे आणि इतर केंद्रीय विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत.
हेही वाचा - किती वाचला? किती पुजला? यापेक्षा बुद्धाचा धम्म आचरणात किती आणला? यालाच मोठे महत्त्व- भदंत इन्दवन्श महाथेरो
नांदेड आणि मुदखेडनंतर त्यांना थेट औरंगाबाद येथे आपल्या पाल्याना शिक्षणासाठी पाठवावे लागत आहे. त्यामुळे मतदार संघातून दिवसेंदिवस केंद्रीय विद्यालय प्रवेशाकरिता प्राप्त होणारे अर्ज ही बाब लक्षात घेता, खासदार हेमंत पाटील यांनी याबाबत केंद्रीय स्तरावर मागणी केली होती. केंद्रा कडून केंद्रीय विद्यालय स्थापनेबाबत पूर्ण सहकार्य करण्यात येणार असून पुढील कार्यवाही राज्यसरकारने करावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यापूर्वी सुद्धा हिंगोली येथे एफ एम केंद्र सुरु करण्यात यावेअशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली होती ही मागणीसुद्धा केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून मान्य झाली असून एफएम केंद्र स्थापनेला वेग आला आहे. तसेच रेल्वेच्या मोकळ्या जागेत शेतमाल साठवून ठेवण्यासाठी ५० हजार मे.टन चे गोदाम स्थापन करण्यात यावे अशी ही मागणी दिवंगत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली होती. ही मागणीसुद्धा मान्य झाली आहे केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी आपल्या मतदार संघात कशा प्रकारे करता येईल. याकडे खासदार हेमंत पाटील यांचे लक्ष आहे राज्य शासनाने मंजूर केलेल्या हळद बोर्डाच्या स्थापनेला वेग आला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे