esakal | ...तर यापुढे फेटा बांधणार नाही : डॉ. अमोल कोल्हे
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Kolhe

डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या जिल्ह्यात आहे. यात्रेतील अंबाजोगाई येथील सभा शनिवारी (ता. २४) झाली. तत्पूर्वी यात्रेचे भव्य दुचाकी फेरीने स्वागत करण्यात आले.

...तर यापुढे फेटा बांधणार नाही : डॉ. अमोल कोल्हे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : धनंजय मुंडे व नमिता मुंदडा आमदार झाल्याशिवाय बीड जिल्ह्यात डोक्याला फेटा बांधणार नाही, असा पण राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. 

डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा सध्या जिल्ह्यात आहे. यात्रेतील अंबाजोगाई येथील सभा शनिवारी (ता. २४) झाली. तत्पूर्वी यात्रेचे भव्य दुचाकी फेरीने स्वागत करण्यात आले. डॉ. कोल्हे, धनंजय मुंडे, नंदकिशोर मुंदडा, नमिता मुंदडा यांनी उघड्या जीपमध्ये फेरीत सहभाग घेत उपस्थितांना अभिवादन केले.

दरम्यान, सभास्थळी पाहुण्यांच्या स्वागतावेळी संयोजक अक्षय मुंदडा हे अमोल कोल्हे यांना फेटा बांधू लागले. त्यावेळी त्यांनी नम्रपणे फेटा बांधून घ्यायला नकार दिला. नंतर, आपल्या भाषणात फेटा बांधण्यास नकार देण्याचे कारण अमोल कोल्हे यांनी विषद केले. परळी व अंबाजोगाईच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रतिसाद पाहता या दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होतील असा आपला विश्वास आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि नमिता मुंदडा आमदार झाल्यानंतरच आपण बीड जिल्ह्यात फेटा बांधू असे अमोल कोल्हे म्हणाले.

loading image
go to top