MPSC Exam
MPSC Examesakal

MPSC Exam : पोह्यामुळे प्रसिद्ध असलेल्या मस्साजोगच्या लेकीची एमपीएससी परीक्षेत बाजी; स्वातीने संघर्षातून 'अशी' मिळवली पोस्ट

पोह्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेल्या गावाची ओळख आता उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचं गाव म्हणून होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावची नवी ओळख नेमकी कशी होतेय, ते बघू.

बीड : पोह्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिध्द असलेल्या गावाची ओळख आता उद्योजक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचं गाव म्हणून होऊ लागली आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावची नवी ओळख नेमकी कशी होतेय, ते बघू.

मागील काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) शरीर विकृतीशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. भारत सोनवणे यांची प्राध्यापकपदी पदोन्नती झाली आहे. ते मूळचे मस्साजोग येथील आहेत. महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब पदासाठी फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत कु.स्वाती रामदास कदम यांची शासकिय वैद्यकीय रूग्णालय व महाविद्यालय, चंद्रपूर येथे औषध निर्माण अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कु. स्वाती कदम यांचे पहिली व दहावीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा मस्साजोग येथे पूर्ण झाले. अकरावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण बाबूरावजी आडसकर महाविद्यालय, केज येथे पूर्ण झाले. बारावीनंतर डी-फार्मसीचे शिक्षण मिरज येथे पूर्ण केले. तर बी फार्मसीचे शिक्षण रत्नागिरी येथे पूर्ण केले.

MPSC Exam
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागची ही आहेत 5 कारणं; 'वंचित'ची एन्ट्री अन् मोदी-शाहांची गरज...

शिक्षण पूर्ण करत असतांना घरची गरीबी, कोरडवाहु जमिनीतील नापिकीमुळे इतरांच्या शेतात मोलमजुरी केल्याशिवाय घरची चूल पेटत नव्हती. आई-वडील, भाऊ व बहीण अशा कदम कुटुंबाने जीवन जगण्याचा संघर्ष केला. घरची परिस्थिती प्रतिकूल, बेताची असल्यामुळे लहानपणापासूनच मनात जिद्द आणि अधिकारी होण्याच स्वप्न बाळगल्याने पुणे महानगरपालिकेतील रूग्णालयात करारांच्या आधारावर दिवसा काम करून रात्री आभ्यास करतांना अनेक अडचणींचा स्वाती यांनी सामना केला.

परंतु यश मिळत नव्हते. कामातून मिळणाऱ्या तुटपुंज्या पगारातून शिक्षण पुर्ण होत नसल्याने आई-वडील, भाऊ यांनी गावात मोलमजुरी करून कु. स्वातीला पैसा पुरवले. आभ्यासातील सातत्य ठेवत जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा अयोगामार्फत महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा गट-ब औषध निर्माता पदासाठी घेण्यात आलेल्या फेब्रुवारी २०२३ च्या परिक्षेत कु.स्वाती रामदास कदम यांनी घवघवीत यश मिळवले.

MPSC Exam
Sagarika Ghose On Rajya Sabha : राजकारणात जाणार नाही म्हणाणाऱ्या सागरिका घोष तृणमूलमध्ये; राज्यसभेचं मिळालं तिकीट

शासकीय वैद्यकिय रुग्णालय व महाविद्यालय चंद्रपूर येथे निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वाती यांचा सन्मान केला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अप्पासाहेब गायकवाड, लक्ष्मण घाटूळ, स्वरूपानंद देशमुख, पत्रकार सतीश जाधव, सुभाष गायकवाड, हनुमंत गायकवाड, ज्ञानेश्वर घाटूळ इत्यादींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कु. स्वाती कदम यांचे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद, मुख्याध्यापक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, ग्रामपंचायत सरपंच संतोष देशमुख , ग्रामसेवक गव्हाणे इत्यादींसह सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com