सहाय्यक अभियंत्यासाठी यंत्रचालकाने मागितली लाच

तानाजी जाधवर
Friday, 22 January 2021

महावितरणाचे शासकीय गुत्तेदार यांनी 55 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने व लाईनमन यांनी प्रोत्साहन दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

उस्मानाबाद : बाह्यस्रोत यंत्रचालक महावितरण उपकेंद्र शहापूर यांनी सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण यांच्यासाठी 15 हजार रुपये लाचेची मागणी केल्याने यांच्यामार्फत पाच हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारण्याचे मान्य केले आहे. तसेच महावितरणाचे शासकीय गुत्तेदार यांनी 55 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने व लाईनमन यांनी प्रोत्साहन दिल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ताब्यात घेतले आहे.

मराठवाड्याच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

तक्रारदार यांचे व इतर शेतकरी यांच्या शेतात विदयुत पुरवठा करणारा महावितरणचा डीपी जळाल्याने तक्रारदरांनी व इतर शेतकऱ्यांनी श्रीकांत हिम्मत साळुंके, वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन ), शहापूर यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती. परंतु डीपी दुरुस्त न झाल्याने, तसेच 63 किलो व्हॅटच्या डीपीचे जागी शंभर किलो क्षमतेचा डीपी लावण्याची प्रक्रिया करण्यासाठी 20 जानेवारी रोजी महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण येथे इंद्रजित बाबुराव शिंदे, बाह्यस्रोत यंत्रचालक महावितरण उपकेंद्र शहापूर यांनी हनुमंत अशोक सरडे, सहाय्यक अभियंता महावितरण कार्यालय नळदुर्ग ग्रामीण यांच्यासाठी तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 15 हजार रुपये लाचेची मागणी केली व हनुमंत अशोक सरडे, सहाय्यक अभियंता यांनी बाह्यस्रोत यंत्रचालक शिंदे यांच्या मार्फतीने पाच हजार रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारण्याचे मान्य केले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

21 जानेवारी रोजी आयुष ट्रान्सफॉर्मर इंजिनिअरिंग वर्क, एमआयडीसी उस्मानाबाद येथे तक्रारदार आणि इतर शेतकरी यांना विदयुत पुरवठा करणारे 63 किलो व्हॅट डीपी बदलून शंभर किलो व्हॅटचा डीपी देण्यासाठी महावितरणाचे शासकीय गुत्तेदार अमीत दशरथ उंबरे यांनी 55 हजार रुपये लाचेची मागणी करून लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारली व श्रीकांत हिम्मत साळुंके, वरिष्ठ तंत्रज्ञ (लाईनमन), शहापूर यांनी प्रोत्साहन दिल्याने आनंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

ही कार्यवाही पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अनिता जमादार, पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौरीशंकर पाबळे, अशोक हुलगे यांनी केली. याकामी त्यांना पोलिस अंमलदार इपतेकर शेख, दिनकर उगलमूगले, पांडुरंग  डमरे, मधुकर जाधव, विष्णू बेळे, विशाल डोके, सिद्धेश्वर तावसकर, अविनाश आचार्य व चालक करडे यांनी मदत केली. कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,येथे संपर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEDCL Sub Center Shahapur has demanded a bribe of Rs 15 thousand for Assistant Engineer MSEDCL Office Naldurg Grameen