बीडमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ जैसे थे; कोरोनाचा आलेख थोडा चढला

१५४ रुग्ण; नवे- जुने ३९ मृत्यू; नवीन बाधितांमध्ये आष्टी आघाडीवर
mucormycosis
mucormycosismucormycosis

बीड: मागील तीन दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या (mucormycosis) नव्या रुग्णांची नोंद नाही, तसेच मृत्यूही नाही. मात्र, कोरोना विषाणू (covid 19) संसर्गाची ओसरत असलेल्या लाटेतही सोमवारी (ता. १४) काहीशी वाढ झाली. रुग्णसंख्येसह पॉझिटिव्हीटी रेटही वाढला. २४ तासांत १० कोरोना मृत्यूची नोंद झाली असून, जुने प्रलंबीत २९ मृत्यूची नोंदही आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. सोमवारी नवीन १५४ रुग्ण आढळले तर २१० रुग्ण कोरोनामुक्त झाले. रविवारी जिल्ह्यातील दोन हजार २१७ लोकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. याचे अहवाल सोमवारी प्राप्त झाले. यात १५४ पॉझिटिव्ह आले.

तपासणीच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचे प्रमाण (पॉझिटिव्ह रेट) ६.९४ होता. चार टक्क्यांपर्यंत खाली आलेले प्रमाण सोमवारी वाढले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात नऊ, आष्टी ५९, बीड १४, धारूर पाच, गेवराई ११, केज २२, माजलगाव चार, परळी एक, पाटोदा दोन, शिरूर २० व वडवणी तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. एकूण बाधितांचा आकडा ८९ हजार ४९१ इतका झाला आहे. आतापर्यंत ८५ हजार ५८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एक हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

mucormycosis
'भविष्यातही मुख्यमंत्री शिवसेनेचाच'- मंत्री अब्दुल सत्तार

कोरोनाबळींची संख्या २,३४६
सोमवारी नवीन १० व जुन्या २९ अशा ३९ कोरोना बळींची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. आतापर्यंत जिल्ह्यात २,३४६ कोरोनाग्रस्तांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. २४ तासांतील दहा बळींमध्ये ७० वर्षीय पुरुष वानगाव (ता. बीड), ५५ वर्षीय पुरुष कसबा विभाग (धारूर), ६० वर्षीय महिला उपळी (ता. वडवणी), ७६ वर्षीय पुरुष पायतळवाडी (ता. माजलगाव), ७४ वर्षीय महिला अंबलटेक (ता. परळी), ५२ वर्षीय पुरुष पूरग्रस्त कॉलनी (बीड), आष्टी तालुक्यातील कासेवाडी येथील ६९ वर्षीय पुरुष, आष्टीतील ९० वर्षीय महिला, धामणगाव येथील ८० वर्षीय पुरुष व कारखेलच्या ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

mucormycosis
PHOTOS: मेस्सी, छेत्री की रोनाल्डो? पाहा सर्वाधिक गोलस्कोरर

म्युकरमायकोसिसचे नवे रुग्ण नाहीत
मागील तीन दिवसांपासून म्युकरमायकोसिसच्या नव्या रुग्णांत वाढ झालेली नाही. आतापर्यंत १५३ रुग्णांची नोंद असून, यामध्ये काही बाहेर जिल्ह्यातील रुग्णांचाही समावेश आहे. आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, १२१ रुग्णांवर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. आतापर्यंत २० रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com