.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
कन्नड - राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला उत्साहाने सरसावल्या असतानाच याचा गैरवापर होत असल्याचे कन्नड तालुक्यात निदर्शनास आले आहे. तब्बल बारा पुरुषांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी प्रस्ताव दाखल केल्याचे दिसून आल्याचे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी नीलेश राठोड यांनी सांगितले.