esakal | मुंबईहुन परतलेले परिवहन महामंडळाच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, आकडा वाढण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

3Corona_102

प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आठवडाभर मुंबईसह परिसरात वास्तव असलेले किल्लेधारुर येथील परिवहन महामंडळाचे ४४ कर्मचाऱ्यांपैकी २३ परतले आहेत. त्यांची सोमवारी (ता.नऊ) ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

मुंबईहुन परतलेले परिवहन महामंडळाच्या आठ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, आकडा वाढण्याची शक्यता

sakal_logo
By
प्रकाश काळे

किल्लेधारुर (जि.बीड) : प्रवाशांच्या वाहतुकीसाठी आठवडाभर मुंबईसह परिसरात वास्तव असलेले किल्लेधारुर येथील परिवहन महामंडळाचे ४४ कर्मचाऱ्यांपैकी २३ परतले आहेत. त्यांची सोमवारी (ता.नऊ) ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या संदर्भात ‘सकाळ’ने केलेले भाकीत खरे ठरले आहे. दुपारनंतर अन्य कर्मचारी परततील असा अंदाज असुन सायंकाळपर्यत हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात ११ बसेस व ४४ कर्मचारी पाठविण्यात आले होते.

कंगना राणावतच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानास्पद शब्द वापरल्याचे प्रकरण

दोन दिवसांत परतणार आहेत. मुंबईत लोकल्स व रेल्वे बंद असल्याने वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी राज्यातील परिवहन महामंडळाच्या बसेस व कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. मात्र अत्यावश्यक सेवेसाठी म्हणून महामंडळाचे कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या खाईत लोटले जात आहे. प्रवाशी वाहतुकीसाठी येथील आगारातून दोन टप्प्यात २२ बसगाड्या व ८८ कर्मचाऱ्यांना मुंबईसह परिसरात पाठवण्यात आले होते. त्यापैकी रविवारी संध्याकाळपासुन परतलेल्या २३ कर्मचाऱ्यांची ॲन्टीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली असून ‘सकाळ’ने वर्तवलेले भाकीत खरे ठरले आहे. या संदर्भात सोमवारी सांयकाळपर्यंत पहिल्या टप्प्यात पाठवण्यात आलेल्या ४४ कर्मचाऱ्यांच्या पैकी उर्वरित २१ कर्मचाऱ्यांची टेस्ट कोविड सेंटरमध्ये झाल्यानंतर नेमकी संख्या निश्चित होणार आहे.


संपादन - गणेश पिटेकर